पंढरीची वारी

पंढरीच्या वारी वाटे । मनी अती हर्ष दाटे ।।
मुखे घोष चाले । जय जय राम कृष्ण हरि ।। १ ।।

वारीच्या मार्गे । वैष्णवांची दाटी ।।
विठ्ठलाच्या भेटीसाठी । आसुसले जीव ।। २ ।।

भेदाभेद अमंगळ । नाही कोणा ठायी ।।
समतेने पाही । सार्‍या माऊली विठाई ।। ३ ।।

ज्ञानेश्वर तुकोबा । पालखी सोहळा ।।
मागेपुढे सभोवती चाले । भक्त वृंद मेळा ।। ४ ।।

आषाढी-कार्तिकी वारी । नेम चालला कित्येक शतके ।।
उच्च-नीच भेद नाही । सारे समान राव आणि रंक ।। ५ ।।

समतेची पताका धरी । वारकरी खांद्यावरी ।।
माऊली बंधुभाव जागतो । चालली पंढरीची वारी ।। ६ ।।

– अधिवक्ता प्रकाश देशपांडे, पुणे