उत्तराखंड सरकार राज्यात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या सिद्धतेत !

उत्तराखंड चे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड सरकारने राज्यात लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेशच्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकाची माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उत्तराखंड सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याचे सुचवण्यात आले आहे. संघाच्या ३५ पदाधिकार्‍यांनी सत्ताधारी भाजपासमवेतच्या बैठकीत सांगितले की, आसाम आणि उत्तरप्रदेश राज्यांप्रमाणेच लोकसंख्याशास्त्रीय संतुलन राखण्यासाठी सरकारला उत्तराखंडमध्येही लोकसंख्या नियंत्रण धोरण स्वीकारावे लागेल.