|
नवी देहली – बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे. दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांध आंदोलनकर्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणामध्ये २ आक्रमक ठार, तर ११ पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे.
१. घुसखोरांनी प्राचीन मंदिरांच्या भूमींवर उघडपणे अतिक्रमण केले आहे. त्यांनी सर्वाधिक अतिक्रमण वैष्णव मठांच्या भूमींवर केले आहे.
२. वर्ष २०१४ मध्ये आसाममध्ये भाजप सत्तेत आला. त्या वेळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या भूमीवर अतिक्रमण करणार्यांना हुसकावून लावण्यासाठी अभियान चालवले होेते. १५-१६ व्या शतकातील विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्याशी संबंधित मोठ्या भूमीवरही घुसखोरांना अतिक्रमण केले होते.
३. अतिक्रमण करणार्यांमध्ये बहुतांश बांगलादेशी घुसखोर आहेत, जे बंगाली भाषा बोलतात. वर्ष २०१७ मध्ये एका सरकारी गटाच्या अहवालामध्ये आढळून आले की, रात्रंदिवस भूमी कह्यात घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. त्यांना विरोध करणार्या आदिवासींना शस्त्रधारी घुसखोरांशी सामना करावा लागतो. अशा प्रकारे बांगलादेशी घुसखोरांनी भूमी कह्यात घेऊन अनेक गावे वसवली आहेत.
४. माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार आसामच्या ४ लाख हेक्टर जंगल क्षेत्रावर बांगलादेशी धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे. हे राज्याच्या एकूण जंगल क्षेत्राच्या २२ टक्के आहे. एका सरकारी समितीला आढळले की, आसामच्या ३३ जिल्ह्यांमधील १५ जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर वरचढ ठरले आहेत.
आसाम सरकारची ‘पी.एफ्.आय.’वर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? ‘पी.एफ्.आय.’ ही जिहादी संघटना राष्ट्रासाठी धोकादायक असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालून या संघटनेच्या प्रमुखांना कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक
आसाम सरकारने धौलपूर येथील हिंसाचाराशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे केंद्र सरकारला पाठवली असून त्यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेवर पूर्णपणे प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे. पी.एफ्.आय.च्या जिहाद्यांनी मागील ३ मासांत अतिक्रमण करणार्यांकडून २८ लाख रुपये गोळा केले आहेत. त्या बदल्यात त्यांना ‘तुम्ही अतिक्रमण केलेली भूमी रिकामी केली जाणार नाही’, अशी हमी देण्यात आली आहे.
Assam CM Himanta Biswa Sarma calls for a ban on Islamist group PFI, reveals details of conspiracy behind violence in Assam https://t.co/4kKDdamLpH
— OpIndia.com (@OpIndia_com) September 26, 2021