पुणे, २२ सप्टेंबर – ‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या अहवालानुसार पुणे शहरात वर्ष २०१९ मध्ये अल्पवयीन मुलांविषयीचे ९४८ गुन्हे नोंद झाले आहेत, तर वर्ष २०२० मध्ये ६६५ गुन्हे नोंद झाले आहेत. तुलनेने गुन्हे अल्प होत आहेत; परंतु या गुन्ह्यांचा तपासही अतिशय संथ गतीने होत असून सध्या १ सहस्र १५३ गुन्हे तपासासाठी प्रलंबित आहेत.
वर्षभरात केवळ २७९ गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. हे प्रमाण केवळ ४० टक्के एवढे आहे. ज्या खटल्यांची सुनावणी झाली, त्यापैकी ४३ खटल्यांमधील आरोपी निर्दोष सुटले असून केवळ १९ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली.