मुंब्रा (ठाणे) येथून आतंकवादविरोधी पथकाने एका धर्मांधाला कह्यात घेतले

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे, २० सप्टेंबर (वार्ता.) – मुंब्रा येथील कौसा भागातील चांदनगर येथून रिजवान मोमीन नावाच्या एका शिक्षकाला आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले आहे. तो मागील एक मासापासून येथील ‘नूरी’ या इमारतीमध्ये भाड्याने रहात होता. तो खासगी शिकवणी चालवत असून यापूर्वी मुंबई येथे शिक्षक होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे; मात्र पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे.