धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

  • ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेच्या विरोधात ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वतीने ऑनलाईन ‘हिंदुत्व रक्षण बैठक’ ! 

  • नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांसह भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !

मुंबई – ११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेत आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर तेथील नागरिक मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले. तीच दृष्टी हिंदूंविषयी निर्माण करण्यासाठी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) ही हिंदुविरोधी परिषद घेण्यात आली. त्यामुळे हिंदूंनी सतर्क रहायला हवे. या दुष्प्रचाराला वैचारिक आणि बौद्धिक स्तरावर अभ्यासपूर्ण उत्तर द्यायला हवीत. या परिषदेच्या माध्यमातून वैचारिक आतंकवाद पसरवला गेला. हिंदु धर्माचा विनाश अशक्य आहे, हे सत्य आहे; मात्र धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करायला हवा. देश-विदेशात अशा हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्याला आशीर्वाद आणि यश प्राप्त झालेले असून केवळ आपल्याला कृती करायची आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा एक भाग म्हणून  १२ सप्टेंबर २०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन हिंदुत्व रक्षण बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीला भारतभरातील विविध राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांतून अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी परिषदेच्या संदर्भात मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

बैठकीच्या प्रारंभी हिंंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या बैठकीची प्रस्तावना करतांना ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ याविरोधात आतापर्यंत वैध मार्गाने दिलेल्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.