भाऊ-बहीण नाते आहे लौकिक ।
गुरु-शिष्य नाते
आहे अलौकिक ।। १ ।।
भाऊ बहिणींमध्ये
असे प्रेम सीमित ।
गुरु शिष्यांमध्ये असे
प्रेम असीमित ।। २ ।।
बहिणींच्या मनी असे
भावाचा उत्कर्ष ।
गुरूंच्या मनी असे शिष्याचा परमोत्कर्ष (टीप १) ।। ३ ।।
इंद्राणीने पातिव्रत्याच्या बळाने केले इंद्राचे रक्षण ।
गुरुकृपेने होत असते शिष्याचे सदैव आत्मरक्षण ।। ४ ।।
बहीण भावाचे असे मायेचे बंधन ।
गुरूंचे शिष्याला मायेतून मुक्तीचे आशीर्वचन ।।५।।
टीप १ – आध्यात्मिक उन्नती
– श्री. प्रणव मणेरीकर, दिल्ली (२२.८.२०२१)