(म्हणे) ‘तालिबानने शरीयतनुसार सरकार चालवावे ! – मेहबूबा मुफ्ती

आज अफगाणिस्तानमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे राज्य आल्यावर मेहबूबा मुफ्ती अशी मागणी करत आहेत. उद्या काश्मीरमध्येही आणि संपूर्ण भारतामध्ये हीच स्थिती आल्यावर त्याच नव्हे, तर एकजात सर्व धर्मांध नेते हीच मागणी करतील, हे लक्षात घेऊन हिंदुघातकी धर्मनिरपेक्षतेला कायमची तिलांजली द्या आणि लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक

मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – तालिबान आता वास्तव बनले आहे. हे समजून घेतले पाहिजे. तालिबानने शरीयत कायद्यानुसार अफगाणिस्तानात सरकार चालवावे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.