‘इस्लामिक स्टेट खुरासान’कडून भारतावर आक्रमण होण्याची शक्यता

इस्लामिक स्टेट खुरासान पाकच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्याची शक्यता असल्याने अशी आक्रमणे रोखण्यासाठी पाकला नष्ट करा ! – संपादक

इस्लामिक स्टेट खुरासान

नवी देहली – ‘इस्लामिक स्टेट खुरासान’कडून (‘खुरासान’ म्हणजे उत्तर पूर्वी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा भूप्रदेश) भारतावर आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या संघटनेचे आतंकवादी भारतातील मंदिरे, राजकीय नेते आणि गर्दीची ठिकाणे, तसेच विदेशी व्यक्तींना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
अस्लम फारूकी हा इस्लामिक स्टेट खुरासानचा प्रमुख आहे. फारूकी पाकच्या  खैबरपख्तूनख्वा प्रांताचा रहिवासी आहे. तो ‘लष्कर-ए-तोयबा’शीही निगडीत आहे. फारूकी आतापर्यंत अफगाणिस्तानातील बगराम तुरुंगात बंद होता. तालिबान्यांनी काबुलवर वर्चस्व मिळवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेचच त्याने काबुल विमानतळावर आत्मघातकी बाँबस्फोट घडवून आणले.