‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ ही आंतरराष्ट्रीय परिषद रहित करा ! – जगभरातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

#DGH_Panelists_Hindu_Haters ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थानी !

हिंदूंनो, भारताला शत्रूंपासून मुक्त करून ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी कटीबद्ध व्हा ! – संपादक

मुंबई – हिंदूंना हिंसक दाखवण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील ४० हून अधिक विद्यापिठे या परिषदेची सहप्रायोजक आहेत. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या या परिषदेला विरोधही होत आहे. १ सप्टेंबरच्या सायंकाळी देश-विदेशांतून सहस्रावधी हिंदुत्वनिष्ठांनी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून ‘ट्विटर’च्या माध्यमातून अभियान राबवले. जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच भारतात प्रथम क्रमांकावर आला.

ऑनलाईन अभियानाची ठळक वैशिष्ट्ये

१. अमेरिका, युनायटेड किंगडम, आयर्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, संयुक्त अरब अमिरात, जपान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधील हिंदूंनी या ऑनलाईन आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

२. हिंदूंनी हातात ‘प्ला-कार्ड’ (हस्तफलक) धरून स्वतःची छायाचित्रे अथवा व्हिडिओ अपलोड करत आंतरराष्ट्रीय परिषदेचा निषेध केला.

३. ‘हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेचे वैश्विक षड्यंत्र थांबवा !’, ‘हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय परिषद रहित करा !’, या आशयाच्या विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

४. कार्यक्रम रहित करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे प्रशासनाला प्रत्यक्ष निवेदने देण्यात आली.

५. हिंदु जनजागृती समितीने तिच्या संकेतस्थळावरून या हिंदुविरोधी कार्यक्रमाद्वारे होणारे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ‘ऑनलाईन हस्ताक्षर अभियान’ चालू केले आहे.

ऑनलाईन याचिकेची (‘पिटीशन’ची) लिंक : https://www.HinduJagruti.org/protest-dgh