विविध प्रकारच्या ‘जिहाद’प्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हेसुद्धा जिहाद्यांनी हिंदु समाजाच्या विरोधात पुकारलेले युद्धच आहे. सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या असून त्यांची फसवणूक झाली आहे, तसेच त्यांचे भयानक शोषणही होत आहे, याची अनेक उदाहरणे विविध माध्यमांतून समोर आली आहेत. ‘लव्ह जिहाद’मुळे मोठ्या प्रमाणात भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील हिंदूंसहित शीख युवतींचेही धर्मांतर झाले असून हिंदु कुटुंबव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होत आहे. सध्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात येथील सरकारांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केला आहे. ‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे म्हणतात, त्यांचा लव्ह जिहादच्या विरोधातील कायद्याला विरोध का आहे ?