गांधी यांनी जी घोडचूक केली, ती मोदी यांनी करू नये ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख

महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर

मुंबई – हिंदूंच्या हितासाठी देशातील हिंदूंनी भाजपला निवडून दिले आहे. भाजपने मात्र हिंदूंचे हित न पहाता अफगाणिस्तानच्या नागरिकांना भारतात शरण देण्याचा कटू निर्णय घेतला आहे. मोदी यांचा हा निर्णय देशाला खड्ड्यात टाकणारा आहे. गांधींनी जी घोडचूक केली, ती मोदी यांनी करू नये, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केले आहे.

या आवाहनात अजय सिंह सेंगर यांनी म्हटले आहे, ‘‘अफगाणिस्तानातून भारतात येण्यास इच्छुक असलेल्या अफगाण नागरिकांना अल्पवेळेत व्हिसा दिला जाणार आहे.  कालपर्यंत मोदी यांचे सर्व निर्णय देशहितासाठी सर्वाेत्तम होते; मात्र हा निर्णय चुकीचा आहे. फाळणीच्या वेळी जसा अन्य नागरिकांना देशात आश्रय देण्यात आला, त्याप्रमाणे हा निर्णय आहे. महाराष्ट्र करणी सेनेचा या निर्णयाला विरोध आहे.’’