अमेरिकी सैन्यावर आक्रमण केले, तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ! – जो बायडेन यांची तालिबानला चेतावणी

२० वर्षे लढूनही अफगाणिस्तानला तालिबानमुक्त करू न शकणार्‍या अमेरिकेची ही चेतावणी हास्यास्पदच ठरते ! – संपादक 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही तालिबान्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आमच्या सैन्यावर किंवा काबुल विमानतळावर चालू असलेल्या बचावकार्यावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण केले, तर त्याला तितक्याच तीव्रतेने आणि सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बायडेन यांनी पुढे म्हटले की, अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो (जगातील २९ देशांचा सहभाग असलेली सैन्य संघटना) यांचे सैन्य माघारी आले असले, तरी अमेरिकेचा आतंकवादाच्या विरोधातील लढा कायम रहाणार आहे. यासाठी आमचे सहकारी आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता रहावी, यासाठी इच्छुक असणार्‍या सर्वच देशांसमवेत आम्ही मिळून काम करू.