हिंदुद्रोही मुनव्वर राणा यांच्या विरोधात जळगाव येथे गुन्हा नोंद !

  • सामाजिक प्रसारमाध्यमांतून महर्षि वाल्मीकि यांचा अवमान केल्याचे प्रकरण

  • भाजपचे नगरसेवक श्री. कैलास सोनवणे यांच्याकडून तक्रार प्रविष्ट

हिंदुद्रोह्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी  तत्पर असणार्‍या श्री. कैलास सोनवणे यांचे अभिनंदन ! अन्य धर्मप्रेमींनीही त्यांच्याकडून बोध घ्यावा ! – संपादक 

मुनव्वर राणा

जळगाव, २० ऑगस्ट (वार्ता.) – यू ट्यूबवर ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीच्या ‘व्हिडिओ’मध्ये लखनऊ येथील उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी महर्षि वाल्मीकि यांना ‘डाकू’ संबोधले आहे. हा ‘व्हिडिओ’ जळगाव येथील भाजपचे नगरसेवक श्री. कैलास सोनवणे यांनी पाहिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी येथील शनीपेठ पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी राणा यांच्या विरोधात कलम २९८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.