सातारा, १९ ऑगस्ट (वार्ता.) – काही मंत्री जरंडेश्वर समूह मोडून काढायला निघाले आहेत. समाजाविषयी काहीही न वाटणारे सरकार पुढल्यावर्षी पायउतार होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजराज्य येईल, असा विश्वास जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा श्रीमती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेव्हा त्या बोलत होत्या.
डॉ. शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या की, जरंडेश्वर साखर कारखाना सभासद आणि शेतकरी यांच्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रस्त्यावर आल्याविना रहाणार नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार सभासद आणि शेतकरी यांना जरंडेश्वर कारखाना देण्यासाठीच ईडीने तो कह्यात घेतला आहे. लवकरच तो पुन्हा सभासद आणि शेतकरी यांना मिळेल. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा याविषयी नक्कीच आपल्याला सहकार्य करतील.