भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी ५ गावे मागितली होती, आम्ही देशासाठी ५ कायदे मागत आहोत ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

  • देहली येथे ब्रिटीशकालीन कायदे रहित करण्यासाठी ‘भारत जोडो आंदोलन’ !

  • २ सहस्र लोकांची उत्स्फूर्त उपस्थिती !

ब्रिटीशकालीन कायदे रहित करण्यासाठी, तसेच राष्ट्रहित जोपासणारे कायदे निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमींना आंदोलन का करावे लागते ? केंद्र सरकार स्वतःहून अशी कृती का करत नाही ? – संपादक

नवी देहली, ८ ऑगस्ट (वार्ता.) – भारत स्वतंत्र होऊन ७ दशकांनंतरही आपण ब्रिटिशांनी बनवलेले कायदे वापरत आहोत, हे दुर्दैवी आहे. भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी ५ गावे मागितली होती. आम्ही देशहितासाठी केवळ समान शिक्षण, समान नागरी कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा असे ५ कायदे मागत आहोत, अशी मागणी ‘भारत बचाओ आंदोलना’चे  प्रणेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी येथील जंतर मंतर या ठिकाणी केली. येथून आज ‘भारत जोडो आंदोलन’ करण्यात आले.

आंदोलनाला उपस्थित राष्ट्रप्रेमी नागरिक

या आंदोलनाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीची पार्श्वभूमी असतांनाही २ सहस्र लोक स्वप्रेरणेने आंदोलनाला उपस्थित राहिले.

या वेळी २२२ ब्रिटीशकालीन अन्यायकारी कायद्यांची होळी करण्यात आली. आंदोलनासाठी देहलीच्या आजुबाजूच्या क्षेत्रातील अनेक युवक बसगाड्या करून आले होते. कोरोना महामारीच्या दृष्टीने सर्व काळजी घेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

क्षणचित्रे

आंदोलनासाठी उत्तरप्रदेश, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी विविध राज्यांतूनही लोक आले होते.

२. युवकांसमवेतच महिला आणि वरिष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३. आंदोलनामध्ये उच्चशिक्षित लोकांचे प्रमाणदेखील अधिक होते.

४. आंदोलन चालू झाल्यावर काही काळाने पावसाला प्रारंभ झाला, तरीही आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नाही.

५. देहली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांसमवेतच विशेष कमांडोही तैनात होते. (राष्ट्रप्रेमींच्या आंदोलनाला उपस्थित रहाणारे पोलीस राष्ट्रविघातकी लोकांनी आयोजित केलेल्या आंदोलनांना उपस्थित राहून त्यांच्यावर कारवाई करतात का ? – संपादक)