
मिरज, ४ ऑगस्ट (वार्ता.) – चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य केले जात आहे. या साहाय्यसाठी हातभार म्हणून ‘मिरज केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांसाठी सुमारे ३५ सहस्र रुपयांची औषधे अर्पण केली. असोसिएशनच्या वतीने श्री. मुकुंद माळी, श्री. कोळसे-पाटील आणि त्यांचे दोन सहकारी यांच्या हस्ते ही औषधे सनातन संस्थेच्या वैद्या श्रीमती मृणालीनी भोसले यांनी स्वीकारली. (स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची कृती आदर्शवत् आहे ! इतरांनीही त्यातून प्रेरणा घेऊन समाजबांधवांना साहाय्य करावे ! – संपादक)
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !