‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ (साप्ताहिक दिनविशेष)’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, ग्रीष्मऋतू, आषाढ मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ

२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांना विलंब होण्याचा संभव असतो. २.८.२०२१ या दिवशी रात्री ११.४५ पासून ३.८.२०२१ या दिवशी दुपारी १.०० पर्यंत आणि ६.८.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.२९ पासून ७.८.२०२१ या दिवशी सकाळी ६.५५ पर्यंत विष्टी करण आहे.
२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २.८.२०२१ या दिवशी सकाळी १०.२८ पासून रात्री १०.४३ पर्यंत आणि २.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.४२ पासून दुसर्या दिवशी दुपारी १.०० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ इ. कामिका एकादशी : आषाढ कृष्ण पक्ष एकादशीला ‘कामिका एकादशी’ म्हणतात. ४.८.२०२१ या दिवशी कामिका एकादशी आहे. ‘कामिका एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूच्या वामन रूपातील पूजनाने सर्व प्रकारच्या त्रासांतून मुक्ती मिळून इच्छित फलप्राप्ती होते’, असे मानले जाते. या दिवशी श्रीविष्णुसहस्रनाम वाचावे.
२ ई. बृहस्पतिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. गुरुवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘बृहस्पतिप्रदोष’ किंवा ‘गुरुप्रदोष’ म्हणतात. ५.८.२०२१ या दिवशी बृहस्पतिप्रदोष आहे. ‘बृहस्पतिप्रदोष’ हे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो’, असे मानले जाते. ‘प्रदोष’ या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ उ. संत नामदेव पुण्यतिथी : आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी या तिथीच्या दिवशी संत नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करतात.
२ ऊ. संत सावता महाराज पुण्यतिथी : आषाढ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीच्या दिवशी संत सावतामाळी यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करतात.
| टीप १ – भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त, एकादशी, प्रदोष आणि शिवरात्री यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । २. तुका म्हणे हरिच्या दासा । |
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.(२२.७.२०२१)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !