राज्य सरकारच्या संमतीनेच ‘फोन टॅपिंग’ ! – रश्मी शुक्ला यांच्या अधिवक्त्यांची माहिती

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांना पोलीस विभागातील स्थानांतर आणि नियुक्त्या यांमध्ये होणार्‍या भ्रष्टाचाराच्या तक्रारी पडताळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही संपर्क क्रमांकांवर होणारे संभाषण ध्वनीमुद्रित (टॅप) करण्याची संमती दिली होती, अशी खळबळजनक माहिती डॉ. रश्मी शुक्ला यांचे अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. राज्य पोलीस महासंचालकांनी याविषयीचे आदेश दिले होते.