मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन फेटाळला !

  • अश्लील व्हिडिओ चित्रित केल्याचे प्रकरण

मुंबई – अश्लील व्हिडिओ चित्रीत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज २८ जुलै या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. पोलिसांनी न्यायालयाकडे कुंद्रा यांच्यासाठी ७ दिवसांची कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने ती असंमत केली. सध्या कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहेत.