सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेला उपस्थित जिज्ञासूंचे निवडक अभिप्राय

  • सायली भांबीड – आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सुख-समाधानासाठी या गोष्टींची आवश्यकता आहे.
  • ईश्वर महाराज – (जय गोरोबा काका अन्न छत्र सेवा मंडळ ट्रस्ट, तेर, धाराशिव, जिल्हा महाराष्ट्र , भारत) विश्वातील सर्व संतांचे परिक्षक म्हणून आपल्या वाणीतून चिंतनाचा विषय निघाला आहे. धन्यवाद माऊली
  • अजित अवहाले – सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात नामजपावर पुष्कळ लवकर मन एकाग्र होते. तेथे राहून साधना करणे खरेच सुलभ होते.
  • अमोल दांगडे – अशी शिकवण सर्व मुलींना दिली अथवा त्यांनी घेतली, तर मुलींवर होणारी भ्याड आक्रमणे ८० टक्क्यांनी अल्प झाल्याविना रहाणार नाहीत.
  • वंदना जगताप – पुष्कळ चांगली माहिती मिळाली. मी पहिल्यांदा पाहिली. (अशी माहिती ऐकली.) असे कार्यक्रम नेहमी घ्यायला हवेत. आम्हीही साहाय्य करू. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरूंना विनम्र अभिवादन.
  • कैलाश वाघये – मी शिबिरांचे आयोजन करतो. मला विद्यार्थ्यांना ही (स्वरक्षण प्रशिक्षण) कला शिकवण्यासाठी आपण शिबिरात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सिद्ध करण्यात साहाय्य करावे, ही विनंती.
  • रवींद्र गोरे – आजच्या मार्गदर्शनातून केवळ नामजप किवा अध्यात्म यांविषयीच नाही, तर आपली संस्कृती शौर्य आणि वीरतेची आहे, हेही समजले. अन्य आध्यात्मिक संस्था केवळ अहिंसा, प्रेम आणि शांती एवढेच सांगतात.
  • स्नेहल तेरगावकर – सध्याच्या काळात नामजप हीच मोठी साधना आहे. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी हा वाईट काळ (आपत्काळ) कसा निभावायचा ? ते सांगितले. खरोखरच आतापासून कृती (साधना) करणार.
  • उषा जाधव – दळणवळणबंदीच्या काळातही गुरुपौर्णिमेचा आनंद दिल्याविषयी मी गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. साधनेसाठी पुष्कळ मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कृतज्ञता.