
नगर (शिर्डी), २१ जुलै – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साई संस्थानच्या वतीने ५ एप्रिल २०२१ पासून साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २२ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीत साजरा करण्यात येणारा गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

बगाटे यांनी सांगितले की, २२ आणि २३ जुलै या दिवशी पहाटे ४.३० पासून साई मंदिरात काकड आरती, पोथीची मिरवणूक, श्री साई सच्चरितचे अखंड पारायण, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती आणि कीर्तन, असे कार्यक्रम होणार आहेत. २२ जुलै या दिवशी श्री साई सच्चरित अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर आतील बाजूने रात्रभर खुले ठेवण्यात येईल. २३ जुलै या दिवशी अखंड पारायण समाप्ती, साईंचे मंगलस्नान इत्यादी कार्यक्रम होणार असून २४ जुलै या दिवशी मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. तसेच उत्सव कालावधीत पदयात्री साईभक्तांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये आणि संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहनही बगाटे यांनी केले आहे.
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !