कोल्हापूर – इतिहासकाळात शौर्यवान असलेल्या हिंदूंचा जाज्वल्य इतिहास आपल्यापर्यंत पोचू दिला जात नाही. हिंदूंना त्यांच्या शौर्याचा विसर पडल्याने ते आज असुरक्षित वातावरणात जगत आहेत. यावर मात करायची असेल, तर हिंदूंना त्यांच्यातील शौर्य जागृत करावेच लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. शबरी देशमुख यांनी केले. त्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होत्या. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षण संदर्भातील प्रात्यक्षिकांचा ‘व्हिडिओ’ सर्वांना दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रेरणा मठपती यांनी केले.
सहभागी युवतींचे अभिप्राय
१. कु. सुचिता सपकाळे – व्याख्यानातील विषय ऐकून शौर्यजागृती झाली. मलाही स्वरक्षण प्रशिक्षण घ्यायला आवडेल.
२. कु. ऐश्वर्या पाटील – स्वरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे.