‘विशेष विवाह कायदा’ देशभर लागू करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

एका हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह केल्यास तिचा कसलाही छळ आणि तिच्यावर बळजोरी होणार नाही, याचे दायित्व इस्लामी संस्था अन् इस्लामी प्रवक्ते यांनी घ्यायला हवे. असे का होत नाही ? सेक्युलर (निधर्मी) असल्याचा पुरावा देण्याचे कर्तव्य केवळ हिंदूंच्याच माथी का ? सर्वांसाठी एकच न्याय असायला हवा. ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’नुसार (‘विशेष विवाह कायद्या’नुसार) आंतरधर्मीय विवाह होत असल्याची प्रसिद्धी करावी लागते आणि मग विवाह होतो. या तरतुदीविरोधात याचिका प्रविष्ट केलेल्या आहेत. अशा याचिकांना विरोध करायला हवा. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी असे अनेक कायदे झाले आहेत. याचा हिंदूंना लाभ होत आहे. असे कायदे देशभर लागू व्हायला हवेत.