पणजी – गोव्यात ४ जून या दिवशी कोरोनाबाधित १७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र ८६ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ५७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १४ टक्के आहे. ४ जून या दिवशी दिवसभरात १ सहस्र १६० रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ९५ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ९ सहस्र ९९ झाली आहे.
कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १ सहस्र २०८ खाटा सध्या रिकाम्या आहेत.