राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पहाणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे असे प्रकार थांबणार नाहीत !
नागपूर – येथील गुन्हे शाखेने मानकापूर येथील एका खोलीत बनावट नोटा छापून त्या चलनात आणणारे नीलेश कडवे आणि मारुफ खान रफिक खान यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून संगणक, प्रिंटरसह १००, ५०, २०, आणि १० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.