स्वखर्चातून ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ यंत्र गावासाठी उपलब्ध करून दिले !

कुणकेरी आणि आंबेगाव येथील युवक-युवती यांची आदर्श कृती !

सावंतवाडी – सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग खेड्यापाड्यांतून मोठ्या प्रमाणात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्र राज्यातही ऑक्सिजनची न्यूनता आहे, हे ओळखून कुणकेरी आणि आंबेगाव येथील युवक अन् युवती यांनी एकत्र येऊन स्वखर्चातून ८० सहस्र रुपये मूल्याचे ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ यंत्र गावासाठी उपलब्ध करून दिले आहे. २४ मे या दिवशी कुणकेरी-आंबेगाव आरोग्यकेंद्रात या यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. या कार्याविषयी तरुण-तरुणी यांचे गावातून कौतुक होत आहे.