पणजी – गोव्यात २४ मे या दिवशी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील २५ रुग्ण, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ८, तर इतर खासगी रुग्णालयांतील रुग्ण होते. यामुळे कोरोनामृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २ सहस्र ४२१ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ९६३ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ४०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३५.३५ टक्के आहे. दिवसभरात २ सहस्र ३६२ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १४७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून १६ सहस्र २७८ झाली आहे. गोव्यात सध्या मडगाव येथे सर्वाधिक १ सहस्र ५८८ रुग्ण आहेत.