अयोध्येतील हिंदूबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून विजयी

किती मुसलमानबहुल गावांमध्ये हिंदु उमेदवार निवडून येऊ शकतात ? हिंदु सहिष्णु आणि सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळेच असे घडू शकते !

हाफिज अझीमुद्दीन

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील राजापूर या हिंदुबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. हाफिज अझीमुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याला २०० हून अधिक मते मिळाली आहेत. या गावात केवळ ६०० मतदार असून त्यात २७ जण मुसलमान आहेत.

१. हाफिज याने म्हटले की, ही निवडणूक जिंकणे माझ्यासाठी ईदची भेट मिळाल्यासारखे आहे. गावातील हिंदु मतदारांनीच मला निवडून दिले आहे आणि आता त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे.

२. गावातील एक शेतकरी किसान शेखर साहू म्हणाला की, लोकांनी धर्म नाही, तर माणूस पाहून मतदान केले आहे. आम्ही सगळे हिंदु धर्माला मानतो; मात्र मुसलमान उमेदवाराला निवडून देत हे दाखवून दिले आहे की, आम्ही सर्व धर्मांचा सम्मान करतो.