इमामाच्या अंत्यसंस्कारासाठी सहस्रोच्या संख्येने मुसलमानांची उपस्थिती !

बदायू (उत्तरप्रदेश) येथे दळणवळण बंदीचे उल्लंघन

  • हरिद्वार कुंभमेळ्यावरून हिंदूंवर टीका करणारे आता कुठे आहेत ?
  • सहस्रोंच्या संख्येने लोक गोळा होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

बदायू (उत्तरप्रदेश) – येथे अब्दुल हमीद महंमद सालिमुल कादरी या इमामाचे ९ मे या दिवशी निधन झाल्यानंतर दळणवळण बंदीचे उल्लंघन करून सहस्रोंच्या संख्येने मुसलमानांनी अंत्ययात्रा काढल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. उत्तरप्रदेश सरकारने अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित रहाण्यासाठी अनुमती दिली आहे.