महर्षींची दिव्यवाणी म्हणजेच जीवनाडीपट्टी म्हणजे काय ?

अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य ताडपत्रीच्या काही पट्टयांवर लिहिलेले असते. त्यातील ‘जीवनाडी सजीव आहे. नाडी वाचतांना साक्षात् शिव-पार्वती नाडीवर नर्तन करतात’, असे तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले. महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या नाडीभविष्याचे वाचन करण्याचे कौशल्य आज अत्यल्प जणांकडेच उपलब्ध आहे.