विटा (जिल्हा सांगली), ७ मे (वार्ता.) – श्री अमरनाथ १०८ शिवलिंग देवालय आश्रम (भाळवणी, ता. खानापूर) येथील पू. ईश्वरबुवा रामदासी तथा ईश्वर महादेव पाटोळे आणि त्यांचे बंधू कृष्णदेव पाटोळे यांना संपत जैजैराम जाधव गेली अनेक वर्षे धाक दाखवणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे असा प्रकार करत आहेत. तरी संपत जैजैराम जाधव याला तात्काळ अटक करून पू. ईश्वरबुवा रामदासी यांसारख्या संतांवर अन्याय करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे तासगाव तालुका संघटक श्री. सचिन चव्हाण यांनी विटा पोलीस ठाण्यात दिले आहे. या वेळी शिवसेनेच्या महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. शोभाताई पिसाळ, सौ. मनीषाताई पाटोळे, विटा येथील ‘श्रीमान हिंदवी प्रतिष्ठान’चे श्री. महेश बाबर उपस्थित होते. पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साधू-संतांच्या महाराष्ट्रात पू. ईश्वरबुवा रामदासी यांना धमकी देण्याचा प्रकार गंभीर आहे. संतांवरील अन्याय शिवसेना कदापिही सहन करणार नाही. धमकी देणार्यावर कारवाई न झाल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर देण्यात येईल.’’
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ