हरिपूर येथे भागवत कथा पार पडली


सांगली, ३ मे – हरिपूर येथे २३ एप्रिल ते १ मे या कालावधीत विश्‍व कल्याणाच्या हेतूने देहली येथील श्री वैष्णोदेवी भक्त परिवार यांच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. ही कथा सांगली येथील कथावाचक ह.भ.प. (सौ.) संध्या संतोष पाठक यांनी सांगितली. या कथेच्या माध्यमातून शक्तीची उपासना, पंचसाधन मार्ग-यज्ञ दान, तप कर्म स्वाध्याय (अग्निहोत्र), जीवन निष्ठा, गुरुनिष्ठा, वेदनिष्ठा इत्यादी विषयावर चिंतन करण्यात आले.