अनेक रस्त्यांची होणार दुरुस्ती आणि दुपदरीकरण
नवी देहली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लातूरकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मोठी घोषणा केली आहे. लातूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ११४ कोटी रुपयांचा निधी नितीन गडकरी यांनी संमत केला आहे. या निधीमुळे लातूर जिल्ह्यातील रस्त्यांवरून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होण्यास साहाय्य होणार आहे.
अंबाजोगाई-घाटंदूर-अहमदपूर रस्त्यांची दुरुस्ती आणि दुपदरीकरण, उदगीर शहरातील नांदेड-बिदर रोड, उद्गीर महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यांची दुरुस्ती आणि रस्ता दुभाजक यांसह जिल्ह्यातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.