कोरोनामुळे देश सोडून जाणार्‍या चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी नागरिकांमध्ये संताप !

सामाजिक माध्यमांतून टीका

  • लोकहो, अशा कलाकारांचे खरे (पळपुटे) स्वरूप आतातरी ओळखा आणि त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका !
  • युवकांनो, देशावर संकट आल्यावर पलायनवादी भूमिका स्वीकारणार्‍या कलाकारांचा आदर्श ठेवायचा ? कि देशावरील संकटांचा सामना करणार्‍या सैनिकांचा ? हे वेळीच ठरवा !

मुंबई – मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय विदेशात जात आहेत. अभिनेते शाहरूख खान हे त्यांची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन यांच्यासह न्यूयॉर्कला गेले आहेत. अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडूनही हाच प्रकार होत आहे. काही जण मालदीवमध्ये आहेत, तर काही जण अन्य देशांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना काहींनी म्हटले आहे की, हे सेलिब्रिटी (वलयांकित कलाकार) केवळ नावालाच भारतीय आहेत. देशावर कोणतेही संकट आले की, ते लगेच पळ काढतात. भारतात स्थिती बिघडली की, लगेच विदेशात पळून जातात. पैसा येथे कमवा; पण येथील लोकांना आवश्यकता असेल, तेव्हा पळ काढा.