१० वी आणि १२ वीच्या परीक्षा रहित करा किंवा त्या पुढे ढकला ! – विद्यार्थ्यांची मडगाव येथे निदर्शनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मडगाव – इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी १६ एप्रिल या दिवशी मडगाव येथे उद्यानाजवळ निदर्शने करून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रहित कराव्या किंवा त्या पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली आहे. शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच परीक्षा घेणारे गोवा शालांत मंडळ यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. गोवा शालांत मंडळाने इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा पूर्वनियोजनाप्रमाणे होणार असल्याचे नुकतेच घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे.