पणजी – अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून गोवा प्रदेश काँग्रेस समितीतील समन्वयक आणि प्रसिद्धी गट विसर्जित करण्यात आला आहे. गट विसर्जित करण्याविषयी १३ एप्रिलला गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पाठवलेल्या पत्रात गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे की, २ आठवड्यांत या गटाची पुनर्रचना करून त्याविषयी केंद्राकडून अनुमती घ्यावी.
नुकत्याच एका सभेत काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी दिगंबर कामत भाजपमध्ये जाणार, तर आलेक्स रेजिनाल्ड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, असे सांगून पक्षातील नेत्यांवरच टीका केली होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे. १२ फुटीर आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर सभापती २० एप्रिलला अंतिम निर्णय देणार काँग्रेसचे १० फुटीर आमदार आणि मगोचे २ फुटीर आमदार यांच्या अपात्रतेविषयी सभापतींसमोर सादर केलेल्या अपात्रता याचिकेवर सभापती राजेश पाटणेकर २० एप्रिलला सायंकाळी सुनावणी घेणार असून ते अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणी २२ एप्रिलला आहे.