ब्राझिलमध्ये २ कोटी लोक करत आहेत उपासमारीचा सामना !

कोरोनामुळे वाढलेली महागाई आणि बेरोजगारी यांचा दुष्परिणाम !

  • अशी स्थिती उद्या भारतात निर्माण होऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणांनी आतापासूनच प्रयत्न करणे आवश्यक !
  • शासनकर्ते साधना करणारे असतील, तर जनताही साधना करते आणि त्यामुळे देशात अशा प्रकारची संकटे येत नाहीत !

सावो पावलो (ब्राझिल) – कोरोनामुळे ब्राझिलची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. येथे कोरोनामुळे आतापर्यंत सहस्रावधी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कब्रस्तानात मृतदेहांना दफन करण्यास जागा अपुरी पडत आहे. सध्या देशातील २१ कोटी लोकसंख्येपैकी २ कोटी लोक उपासमारीचा सामना करत आहेत. ब्राझिलच्या ‘अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन संस्थे’च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

१. या संस्थेचे अध्यक्ष रेनाटो मालूफ यांनी सांगितले की, शहरांमध्ये लोक रस्त्यांवर येऊन जेवण मागू शकतात; मात्र गावांमध्ये स्थिती पुष्कळ वाईट आहे; कारण तेथे रस्त्यांवर अन्न द्यायलाही कुणी भेटणार नाही. या स्थितीला कोरोनामुळे वाढलेली बेकारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ कारणीभूत आहे.

२. ‘ब्राझिल इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिक्स’च्या नुसार गेल्या एक वर्षात देशात तांदुळाचा भाव ७० टक्के, तर स्वयंपाकाच्या गॅसचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.