सद्गुरु अनुताई, कृतज्ञता की तुम देवी हो मां ।

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

‘२५.६.२०२० ला पहाटे मला स्वप्नात ‘सद्गुरु अनुराधाताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) आश्रमात आल्या आहेत’, असे दिसले. मीही तेथे गेलो होतो. मला दुरून पाहिल्यावर त्या लगेच माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, ‘‘तुझ्या मुखावर प्रसन्नता जाणवत आहे. तुझी सेवा चांगली होत आहे. गुरुकृपा अनुभवत आहेस ना ? भगवंताला अनुभवत आहेस ना ?’’ मला सकाळी उठल्यावरही त्यांचा प्रत्येक शब्द नीट आठवत होता. माझ्या अंतर्मनात जप चालू असल्याचे जाणवत होते. ‘माझा नामजप अंतर्मनात जात आहे’, असे मला वाटत होते. दिवसभर माझा उत्साह टिकून होता. मला ही एक अनुभूतीच वाटत होती. तेव्हा मला सद्गुरु अनुराधाताई यांच्याविषयी पुढील काव्य आपोआप स्फुरले.

कृतज्ञता की तुम देवी हो मां ।
मैं तुझसे क्या मांगू ?
आंचल से छाया कर देती ।
ताकि मैं माया लांघ सकूं ॥ १ ॥

चोट लगने पर मन को मेरे ।
तू सब कुछ है जानती ।
मेरी मां से भी तुम बढकर हो ।
मुझको तू पहचानती ॥ २ ॥

उंगली थाम साधना पथ पर ।
धीरे-धीरे ले जाती ।
गंगा जैसी पावन है तू ।
सहज बहती जाती ॥ ३ ॥

रोज भगवान से हमें मिलाती ।
लीला तेरी है न्यारी ।
खुदसे ज्यादा करती बच्चों की चिंता ।
परम पूज्य की तुम हो प्यारी ॥ ४ ॥

मां अपने प्रेमसागर से मेरी ।
गुरुचरणों की प्यास बुझा दे ।
आनेवाले दस दिनों में (टीप १)।
गुरुप्राप्ति बस, नहीं विचार दूजा दे ॥ ५ ॥

टीप १ : दस दिनोंके बाद याने ५.७.२०२० को गुरुपौर्णिमा थी ।

गुरुदक्षिणा देण्याची माझी पात्रता नाही; पण गुरुदेवांच्या कृपेने स्फुरलेले शब्द सद्गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.’

– श्री. रोहन रवींद्र पातेने, मुंबई (२५.६.२०२०)

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक