‘शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन या दोघांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. दोघांचे भ्रमणभाषवरही संभाषण होत असे. शिवशाहीर बाबासाहेब हे दादाजी यांच्या काही कार्यक्रमांनाही उपस्थित राहिले होते. जणूकाही शिवशाहीर बाबासाहेब यांची ही प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी पोचली आणि सर्व भक्तांवर निरंतर निरपेक्ष प्रेम करणारे योगतज्ञ दादाजी वयाच्या १०० व्या वर्षी, म्हणजे वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२०.५.२०१९) या दिवशी अनंतात विलीन झाले.’ – श्री. अतुल पवार (योगतज्ञ दादाजी यांच्या देहत्यागापर्यंत त्यांच्या समवेत अगदी सावलीप्रमाणे राहिलेले ‘सनातन संस्थे’चे साधक)
श्रीशक्ति,
प.पू. दादाजींना ‘दुःखितांना सुखी करण्यासाठी आणि सत्कार्य करणार्या सेवाभावी सज्जनांना उदंड उदंड ईश्वरी आशीर्वाद अन् सामर्थ्य देण्यासाठी श्री आदिशक्ति जगदंबेने मार्कंडेयाचे (मार्कंडेयऋषींसारखे) आयुष्य द्यावे’, अशीच तिच्या चरणी प्रार्थना करतो. श्री प.पू. दादाजींचा जन्मच या ईश्वरी कार्यासाठी आहे.
श्री जगदंबेने आमच्यासारख्या जरी अगदी सामान्य माणसांच्या जीवनातील ५ – ५ क्षण कमी करून श्री दादाजींच्या आयुष्यांत जमा केले, तरी असंख्य सज्जनांना शिबीराजाचे बळ आणि दधिचिऋषींची सहनशक्ती लाभेल.
‘हे अंबिके, हे चंडिके, हे शारदे, श्री दादाजींना तुझ्या अनंत हातांचे बळ दे ! सुयश दे ! आरोग्यसंपन्न आयुष्य दे !’
आणखी मी काय मागू ?
उदयोऽस्तु । उदयोऽस्तु । जगदंब !
– तुझ्या चरणांचा दास, बळवंत मोरेश्वर पुरंदरे (शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे) (२६.९.२००९)