कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळू मामा यांचा भंडारा उत्सव रहित !

कोल्हापूर – कोरोनाचा संसर्ग असल्याने यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील बाळू मामा यांचा भंडारा उत्सव रहित करण्यात आला आहे. देवालय समिती, ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ५ ते १३ एप्रिल या कालावधीत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.