श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारीवर राग यमन वाजवल्यावर आलेल्या अनुभूती

१. यमन रागातील आलाप वाजवणे

अ. ‘आलाप आरंभ झाल्यावर प्रथम माझ्या अनाहतचक्रावर संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर माझ्या मणिपुरचक्रावर मला संवेदना जाणवू लागल्या आणि शेवटी माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्या.

आ. आरंभी माझी सूर्यनाडी चालू होती. मला माझ्या सहस्रारावर संवेदना जाणवू लागल्यावर माझी सुषुम्ना चालू झाली.

इ. माझ्या नाडीचे ठोके आरंभी ६८ प्रती मिनिट होते. माझी सुषुम्ना चालू झाल्यावर माझ्या नाडीचे ठोके ५८ प्रती मिनिट झाले.

ई. मला शांत, तसेच हलके वाटू लागले. तसेच ‘आता आपले शरीर हलके होऊन भूमीपासून वर उचलले जाईल कि काय’, असेही मला वाटू लागले.

थोडक्यात सांगायचे, तर आलापाचा परिणाम शरिराच्या आत जाणवला.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

२. यमन रागातील द्रुत गतीतील ‘झाला’ वाजवणे

अ. द्रुत गतीतील ‘झाला’ आरंभ झाल्यावर मला त्याची स्पंदने शरिराच्या भोवती जाणवू लागली. मला माझ्या डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत संवेदना जाणवत होत्या.

आ. माझी सूर्यनाडी चालू होती.

इ. या वेळी मनाची शांतता अनुभवता आली नाही.

ई. ‘झाला’ आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ६२ प्रती मिनिट होते. झाला वाजवून पूर्ण झाल्यावर माझ्या नाडीचे ठोके तेवढेच राहिले. त्यांत पालट झाला नाही.

‘झाला’ ऐकण्याचा परिणाम शरिराच्या भोवती झाला.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१०.७.२०१८)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक