जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस !

पुणे, २९ मार्च – महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलीस मुख्यालयातील हवालदार रामदास दत्तोबा थोरात याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वर्ष २०१६ ते २०२० या कालावधीत ही घटना घडली आहे. याविषयी ४० वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात याने पीडित महिलेला लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर चूक झाल्याचे मान्य करून, घर घेण्याचे आणि मासाला १० सहस्र रुपये देऊन सांभाळ करण्याचे आमीष दाखवले होते. ‘पत्नी म्हणून सांभाळ करतो’, असे लिहूनही दिले होते. याशिवाय बलात्काराचा गुन्हा नोंद केल्यास महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे चिठ्ठीत लिहून आत्महत्या करण्याची धमकी पोलिसाने दिली होती. (पोलीस खात्यात असे वासनांध पोलीस असणे, हे खात्याला लज्जास्पद आहे ! – संपादक)
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले