स – सत्मध्ये राहूनी सदा, आपण साधना करूया ।
ना – नामजप, सत्संग आणि सत्सेवा तळमळीने सारे करूया ।
त – तन, मन, धन अर्पूनी सारे, आपण माऊलीला शरण जाऊया ।
न – नतमस्तक होऊनी गुरुमाऊलींच्या चरणी, उन्नतीसाठी प्रार्थूया ।
सं – संत आणि सद्गुरु यांच्या सान्निध्यात, रममाण सारे होऊया ।
स्था – स्थापन करण्या हिंदु राष्ट्र, माऊलींच्या या कार्यात आपण झोकून देऊया ।
सनातन संस्था एक वटवृक्ष ।
दावी मार्ग साधकांना गाठण्या मोक्ष ॥
– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.११.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |