चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
पीलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील भारत आणि नेपाळ सीमेवर भारतीय नागरिक आणि नेपाळ पोलीस यांच्यात झालेल्या वादानंतर हाणामारी झाली. त्यात नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय नागरिक ठार झाला.
#Indian national killed in police firing on Indo-Nepal border https://t.co/SIPxCQezrK
— The Tribune (@thetribunechd) March 5, 2021
UP Police said three Indian nationals, who went to Nepal, had a confrontation with Nepal Police and the firing happened after the argument@pilibhitpolice @iamupp @HMOIndia @DefenceMinIndia https://t.co/LakOJ59qte
— NorthEast Now (@NENowNews) March 5, 2021
त्याच्या एका साथीदाराने हाणामारीमध्येच सीमा पार केल्याने त्याचा जीव वाचला, तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. २६ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव गोविंदा असून तो त्याचा मित्र पप्पू सिंह आणि गुरमीत सिंह यांच्यासमवेत नेपाळमध्ये गेला होता.