‘व्हॉट्सअ‍ॅप’ खाते हॅक करण्यासाठी फसव्या संदेशाचा सुळसुळाट !

मुंबई – ‘तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कोड ३५५-७६६ आहे. तुम्ही v.whatsapp.com/355766 या मार्गिकेवर क्लिक करून तुमच्या भ्रमणभाषची निश्‍चिती करा’, अशा प्रकारचा संदेश व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम यांद्वारे येत आहे. हा फसवा संदेश असून या लिंकवर क्लिक केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपच्या संकेतस्थळासारखे एक संकेतस्थळ उघडते आणि त्यात आपण आपला पिन क्रमांक टाकतो, तेव्हा आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते हॅक होते. त्यामुळे अशा संदेशावर आणि त्यातील लिंककडे दुर्लक्ष करावे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.