नाभिनन्देत मरणं नाभिनन्देत जीवितम् ।
कालमेव प्रतीक्षेत निदेशं भृतको यथा ॥
– मनुस्मृति, अध्याय ६, श्लोक ४५
अर्थ : संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.