अर्थसंकल्पीय अधिवेशन दीर्घकाळ चालवण्यासाठी आरोग्य विभागाकडून आठवड्याला ३ दिवसांची सुट्टी घेण्याचा पर्याय

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिक दिवस चालवण्यासाठी आठवड्याला ४ दिवस कामकाज आणि ३ दिवस सुट्टी, असा पर्याय आरोग्य विभागाकडून सुचवण्यात आला आहे. यामुळे ४ दिवसांच्या कामकाजात कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची लक्षणे ३ दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीत दिसून येतील. त्यानंतर पुढच्या आठवड्यात चाचणी केल्यास कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने सुचवले आहे. या सूत्रावर २५ फेब्रुवारी या दिवशी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आमदारांना कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी सभापतींचे शासनाला पत्र !

विधीमंडळाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक आमदार उपस्थित रहावेत, यासाठी विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी ‘अधिवेशनाच्या आधी सर्व आमदारांना कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.