सीओपीडी मुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक !

घरोघरी होणार्‍या वायू प्रदूषणामुळे हा आजार होण्याची दाट शक्यता !

पुणे – देशात क्रॉनिक ओबस्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज (सीओपीडी) मुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण सर्वात अधिक आहे. प्रतिवर्षी अनुमाने १० लाख लोकांना यामुळे प्राण गमवावे लागत आहेत. घरोघरी होणार्‍या प्रदूषणामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. याविषयी चेस्ट रिसर्च फाऊंडेशन आणि भारती विद्यापिठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या अभ्यासाची माहिती नेचर या शोध प्रश्‍नपत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे. चुलीचा धूर, मॉस्किटो कॉईल, धूम्रपान अशा कारणांमुळे वायू प्रदूषण होऊन त्याचा फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या आजाराविषयी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचे मत प्युअर फाऊंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक दिशा घोरपडे यांनी व्यक्त केले.