(म्हणे) ‘प्रियांका वाड्रा दुर्गादेवीचा अवतार असून त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार !’ – काँग्रेस समर्थक आचार्य प्रमोद कृष्णम

हिंदुत्वाविषयी काहीही ठाऊक नसणार्‍या ख्रिस्ती प्रियांका वाड्रा म्हणे दुर्गादेवीच्या अवतार ! प्रमोद कृष्णम यांच्या अज्ञानाची कीव करावी तेवढी थोडीच !

आचार्य प्रमोद कृष्णम

नवी देहली – प्रियांका वाड्रा या शाकंभरी देवीचा आशीर्वाद घेत आहेत, संगममध्ये स्नान करत आहेत. त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपची हवा निघून गेली आहे.

भाजपचा जो वध आहे तो प्रियांका वाड्रा यांच्या हातूनच होणार आहे, असे विधान काँग्रेसचे समर्थक आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘प्रियांका गांधी या श्रीदुर्गामातेचा अवतार आहेत’, असेही म्हटले आहे.